मुंबई -मंगेश म्हात्रे
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करत थेट भाजपला संदेश देण्यात आला आहे.
राज्यातील सत्तासमीकरणात भाजपसोबत युती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने आपली वेगळी ओळख कायम ठेवत अल्पसंख्याक चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे “युतीत असूनही स्वतंत्र भूमिका” असा स्पष्ट संदेश दिला गेल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांच्या अनुपस्थितीतही त्यांचीच विचारधारा पुढे नेण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरही अजितदादांनी घेतलेली भूमिका आठवण करून देणारी ही चाल मानली जात आहे.




















