Homeताज्या बातम्यामुख्याध्यापिका सौ.आशा तेलंगे मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा....

मुख्याध्यापिका सौ.आशा तेलंगे मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा….

मुख्याध्यापिका सौ. आशा तेलंगे मॅडम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे, दि. २७ (अजय मगरे)

ठाणे महानगरपालिका शाळा क्र. १३० च्या मुख्याध्यापिका सौ. आशा मदन तेलंगे मॅडम या २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा भव्य गौरव सोहळा काजूवाडीतील ठामपा शाळा क्र.१३० च्या मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला.

92972434-b510-4980-9edc-64873abdbe29

या सोहळ्याला ठाणे महानगरपालिका उपायुक्त ( शिक्षण ) सचिन सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी सौ. आशा तेलंगे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, “सौ. आशा तेलंगे यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सर्वोत्तम प्रयत्न केले. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीतगायन, आणि भाषणांच्या माध्यमातून आपल्या प्रिय शिक्षिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील सहकारी शिक्षक आणि शिक्षिका यांनी देखील त्यांच्या सहवासातील अनुभव कथन करत मॅडमच्या नेतृत्वगुणांचे आणि मार्गदर्शनाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ. आशा तेलंगे मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त करत “शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून एक जबाबदारी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हे माझे ध्येय होते, आणि ते पूर्ण करण्याचा मी सदैव प्रयत्न केला” असे सांगितले.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धोक्याच्या छायेत इंदिरा शॉपिंग सेंटर इमारत; नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

मोठ्या दुर्घटनेची भीती; धोकादायक इमारतीवर तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विद्यनेश्वर चौक परिसरातील इंदिरा शॉपिंग सेंटर ही इमारत अनेक वर्षांपासून...

वायू आणि जलप्रदूषणप्रकरणी एमपीसीबीने बारामती ॲग्रोला नोटीस पाठवली आहे. पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक. पुणे...

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

झोपड्या सोडा… पण जायचे कुठे?” पालिकेच्या नोटिशीवर धारावीत संताप;

'अदानी प्रकल्पासाठी घरे मोकळी करण्याचा डाव ' ? - संजय भालेराव मुंबई : प्रतिनिधी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाने धारावीतील माटुंगा लेबर कॅम्प...

जिल्ह्यातील 72 भूस्खलन प्रवण गावांपैकी केवळ 44 गावांसाठी पुनर्स्थापना मंजूर. पुणे बातम्या

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पाटण येथे स्लाईड कोसळली ज्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पुणे : पुणे जिल्ह्यात ओळखल्या गेलेल्या अनेक भूस्खलन प्रवण गावांचे...

error: Content is protected !!