Homeताज्या बातम्यासायन प्रतीक्षा नगर प्रभाग १७३ मध्ये सहा महिला इच्छुक; भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस

सायन प्रतीक्षा नगर प्रभाग १७३ मध्ये सहा महिला इच्छुक; भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस

मुंबई, दि.२९ : मंगेश म्हात्रे

आगामी महापालिका निवडणुकीत सायन–कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. १७३ वर भाजपचा विशेष फोकस दिसत आहे. शनिवारी झालेल्या मुलाखत फेरीत या प्रभागातून तब्बल सहा महिला उमेदवारांनी इच्छुक म्हणून हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

चेंबूरमधील भाजप कार्यालयात झालेल्या या मुलाखत प्रक्रियेत अंजली दास, वैशाली पगारे, शिल्पा केळूसकर, अर्चना जाधव, आरती निजापकर आणि मेघा जोरीगिल यांनी सहभाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायन विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून आलेल्या इच्छुकांचे काम, स्थानिक नेटवर्क आणि मतदारांमधील संपर्काची पाहणी निरीक्षकांकडून करण्यात आली. या मुलाखतींना आमदार पराग आळवणी तसेच भालचंद्र शिरसाठ उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अनपेक्षित दावेदारीमुळे प्रभागात राजकीय खळबळ…
आरती निजापकर आणि मेघा जोरीगिल यांच्या अचानक झालेल्या दावेदारीने भाजपच्याच गोटात खळबळ माजली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघीही स्थानिक स्तरावर भाजप महिला मोर्चामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे या प्रभागात महिला पदाधिकाऱ्यांमध्येच चुरस निर्माण झाली आहे.

प्रभाग १७३ मध्ये परंपरागत जातीय–वर्गीय समीकरणे आणि स्थानिक तक्रार–विकास प्रश्नांमुळे उमेदवाराची निवड नेहमीच कठीण मानली जाते. त्यामुळे सहा महिला उमेदवारांनी उमेदवारीसाठी दाखवलेली उत्सुकता ही भाजपच्या अंतर्गत समीकरणांची नव्याने मांडणी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!