Homeताज्या बातम्या'एसआरए' घर खरेदी- विक्री;  'अभय' योजनेला मुदतवाढ द्या....

‘एसआरए’ घर खरेदी- विक्री;  ‘अभय’ योजनेला मुदतवाढ द्या….

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संजय रणदिवे यांचे निवेदन

मुंबई ,दि. ५ : मंगेश म्हात्रे

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) अंतर्गत नियमबाह्य पद्धतीने झालेल्या घरांच्या खरेदी–विक्री व्यवहारांना कायदेशीर मार्गावर आणण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या ‘अभय योजने’ची मुदत जून २०२५ मध्ये संपली. मात्र या योजनेची योग्य प्रसिद्धी न झाल्याने हजारो झोपडीधारक लाभापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आणत, या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी सांमाजिक कार्यकर्ते संजय रणदिवे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

एसआरए अंतर्गत बांधलेल्या सुमारे ८७ हजार घरांपैकी जवळपास १३ हजार घरे नियमांकडे दुर्लक्ष करूनच विक्री झाली असल्याचे शासनाच्या नोंदीत स्पष्ट झाले आहे. नियमांनुसार एसआरएचे घर मिळाल्यानंतर १० वर्षांच्या आत खरेदी–विक्री करता येत नाही. तरीही मोठ्या प्रमाणावर गुप्त व्यवहार झाले. त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याने हे व्यवहार ‘नियमात’ आणण्यासाठी सरकारने एकवेळची अभय योजना लागू केली होती.

अभय योजना कोणासाठी?

मुंबई आणि ठाणे महापालिका हद्दीत अंतिम परिशिष्ट–२ निर्गमित झाल्यानंतर झोपडीचे हस्तांतरण किंवा खरेदी–विक्री केलेल्या झोपडीधारकांसाठी ही अभय योजना लागू करण्यात आली होती.

सन २०२० पर्यंतचे परिशिष्ट ग्राह्य धरा…

१ जानेवारी २०११ पूर्वी निर्गमित केलेल्या अंतिम परिशिष्ट-२ ऐवजी सन २०२० पर्यंतचे परिशिष्ट ग्राह्य धरण्याची मागणी संजय रणदिवे यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुदतवाढ तातडीची गरज…

वडाळा कोरबा मिठागर परिसरातील अनेक झोपडीधारक अभय योजनेपासून वंचित आहेत. या योजनेला मुदतवाढ मिळाल्यास कोरबा मिठागरसह अनेक झोपडपट्ट्यांसाठी ही मुदतवाढ जीवनदायी ठरेल. गोरगरिब झोपडीधारकांना आपले घरकुल कायदेशीर करण्याची संधी मिळणार असल्याचे संजय रणदिवे यांनी बहुजन शक्ती न्यूज शी बोलतांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!