मुंबई, दि. ११ : मंगेश म्हात्रे
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्हाडा मुंबई मंडळातर्फे गोरेगाव सिध्दार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पात्र सभासदांना पुनर्विकसित इमारतीमधील सदनिकांचे वितरण पत्र उद्या, शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात येणार आहे. तसेच दि. १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विंगनिहाय तपासणीनंतर सदनिकांचा ताबा देण्यात येणार आहे.
म्हाडाच्या गोरेगाव सिध्दार्थनगर (पत्राचाळ) प्रकल्पातील आर-९ भूखंडावरील पुनर्वसन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून २ एप्रिल २०२५ रोजी प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यानुसार प्रत्येक सभासदांना सोडतीनुसार मिळालेल्या सदनिकांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरु होत आहे.
ताबा देण्याचे वेळापत्रक:
१५ सप्टेंबर – C विंग
१६ सप्टेंबर – B विंग
१७ सप्टेंबर – A विंग
१८ सप्टेंबर – D विंग
१९ सप्टेंबर – E विंग
२० सप्टेंबर – F विंग
२१ सप्टेंबर – G विंग
२२ सप्टेंबर – H विंग
२३ सप्टेंबर – I विंग
२४ सप्टेंबर – J विंग
२५ सप्टेंबर – K विंग
२६ सप्टेंबर – L विंग
२७ सप्टेंबर – M विंग
२८ सप्टेंबर – N विंग
२९ सप्टेंबर – O विंग
३० सप्टेंबर – P विंग
तपासणी व ताबा देण्याची प्रक्रिया रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रकल्पस्थळी पार पडणार आहे.
सदर प्रक्रियेत म्हाडाचे अधिकारी, कंत्राटदार मे. रेलकॉनचे प्रतिनिधी, संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच संबंधित सभासद सहभागी राहतील. सभासदांनी उपस्थित राहताना आपले फोटो ओळखपत्र, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन म्हाडाने केले आहे.




















