ठाणे, दि. ५.( प्रतिनिधी )
ठाणे महापालिकेकडून विविध भागांतील शुद्ध पाणी व मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन पाण्याचा वापर नियोजनबद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, भीमगर्जना चाळ परिसर, भैय्यासाहेब आंबेडकर चाळ व पंचशील चाळ येथे सकाळी ७.०० ते १०.३० या वेळेत ठाणे महापालिकेचे शुद्ध पाणी उपलब्ध राहणार असून, सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० या वेळेत मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा होईल.
राजीव गांधी नगर परिसरात सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत शुद्ध पाणी मिळणार असून, रात्री ११.०० ते सकाळी १०.३० या वेळेत मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा राहील.
अगस्ती संगम चाळचा खालचा परिसर, पंचपरमेश्वर मंदिर परिसर आणि हिंदुस्तान हॉटेलमागील संपूर्ण परिसरात दुपारी १.०० ते २.३० या वेळेत शुद्ध पाणी, तर २.३० ते रात्री ८.०० या वेळेत मुंबई महापालिकेचे पाणी उपलब्ध राहणार आहे.
तसेच अगस्ती संगम चाळचा वरील परिसर, संतोषी माता चाळ व सिद्धार्थ चाळ येथे दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शुद्ध पाणी, तर सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० या वेळेत मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा होणार आहे.
महापालिकेने नागरिकांना जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पाण्याचा वापर करून पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले आहे.




















