Homeताज्या बातम्या“डॉ. कलाम यांच्या कार्याचा प्रकाश आजही देशाच्या प्रत्येक युवकाला दिशा देत आहे”...

“डॉ. कलाम यांच्या कार्याचा प्रकाश आजही देशाच्या प्रत्येक युवकाला दिशा देत आहे” – संजय भालेराव.

इनलायटन फाउंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ९४ वी जयंती उत्साहात साजरी..

मुंबई, दि.१६ : मंगेश म्हात्रे

 “राष्ट्रनिर्मिती, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रेरणा म्हणजेच डॉ. कलाम. त्यांचं कार्य आजही देशातील प्रत्येक युवकाला योग्य दिशा देत आहे,” अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे मुंबई प्रदेश सचिव संजय रमेश भालेराव यांनी भावना व्यक्त केल्या.

इनलायटन फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ९४ वी जयंती धारावीतील मॉर्निंग स्टार हायस्कूल सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. फाउंडेशनच्या स्थापनेचे हे ८वे वर्ष असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष इनलायटन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश कुमार होते. यावेळी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कांचन पगारे यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले. फाउंडेशनतर्फे त्यांना सन्मानचिन्ह देऊन मोठ्या मानाने सत्कार करण्यात आला.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संजय भालेराव यांचाही विशेष सन्मान शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

सन्मान स्वीकारताना भालेराव म्हणाले “इनलायटन फाउंडेशनने विद्यार्थ्यांपासून कलाकार, अधिकारी, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव करून समाजामध्ये सकारात्मकता पसरवण्याचे मोठे कार्य केले आहे.”

इनलायटन फाउंडेशनतर्फे गेल्या आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळेच्या बॅगा, क्रीडा प्रमाणपत्रे, तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या फी भरणे, आजारी नागरिकांना आर्थिक मदत, शिक्षणासाठी साहाय्य अशी विविध सामाजिक कार्ये केली जातात.

डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांनी भारलेला हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!