Homeताज्या बातम्याबीकेसीत ENRIQUE IGLESIAS च्या कॉन्सर्टवर राष्ट्रवादी पक्षाचा आक्षेप..

बीकेसीत ENRIQUE IGLESIAS च्या कॉन्सर्टवर राष्ट्रवादी पक्षाचा आक्षेप..

“बेकायदेशीर रस्ता बंद, हॉस्पिटलजवळ ध्वनीप्रदूषणाचा धोका”

मुंबई, दि. ३० : अजय मगरे

मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस शेजारील एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या “ENRIQUE IGLESIAS LIVE IN CONCERT” या आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमावर राष्ट्रवादी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान आयोजकांनी सार्वजनिक रस्ते बंद करून बेकायदेशीर तंबू आणि गेट उभारल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीकेसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पार्टीचे मुंबई प्रदेश सरचिटणीस राजेश सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “कार्यक्रमाच्या निमित्ताने बीकेसी परिसरातील दोन्ही बाजूंचे सार्वजनिक रस्ते नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. आयोजकांकडून नागरिकांना ‘पर्यायी रस्त्याने जा’ असे सांगण्यात येत असून, हे वर्तन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. रस्त्यावर तंबू, तपासणी गेट आणि भव्य स्वागत कमान बांधण्यात आल्या आहेत.”

सातपुते यांनी पुढे म्हटले की, “जेव्हा शेतकरी, विद्यार्थी किंवा कामगार आपले प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा सरकार त्यांच्यावर तातडीने कारवाई करते. मग अशा कॉन्सर्ट आयोजकांवर कारवाई का होत नाही? जर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर राष्ट्रवादी पक्ष जनआंदोलनाचा मार्ग अवलंबेल.”

तक्रारीत दुसरा गंभीर मुद्दा मांडण्यात आला आहे, ध्वनीप्रदूषणाचा धोका. सातपुते म्हणाले, “या कॉन्सर्टमध्ये अत्यंत मोठ्या स्पीकर्सचा वापर होणार आहे, जे निर्धारित आवाजमर्यादेपेक्षा (डेसिबल) जास्त आहेत. यामुळे जवळच असलेल्या ‘एशियन हार्ट हॉस्पिटल’मधील रुग्णांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. केवळ १० मीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिया सुरू असताना अशा तीव्र ध्वनीलहरींमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.”

राष्ट्रवादी पक्षाने या पार्श्वभूमीवर कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांना या परिसरात परवानगी देऊ नये, अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे.स्थानिक नागरिकांनीही या तक्रारीला पाठिंबा देत, प्रशासनाने त्वरित चौकशी करून रस्त्यांची मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!