कोपरगाव ,दि. १५ दिलीप गायकवाड
कोपरगाव येथील ज्येष्ठ मुक्त पत्रकार गहिनीनाथ घुले यांचे जुळे चिरंजीव शिव व तेज यांचा प्रथम वाढदिवस महाशिवरात्र या पवित्र पर्वणीच्या निमित्ताने धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
मागील वर्षी महाशिवरात्र दिनी जन्मलेले शिव व तेज यांचा वाढदिवस कुंभारी गावातील गोदावरी गंगा नदी तीरावर वसलेल्या प्राचीन व प्रसिद्ध राघवेश्वर महादेव मंदिर येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी अभिषेक, पूजा-अर्चा व विविध धार्मिक विधी करण्यात आले.
कार्यक्रमास मंदिराचे महंत १०८ प.पू. राधवेश्वरानंद गिरिजी महाराज उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बालकांना आशीर्वाद देण्यात आला. शिव व तेज यांची आई आशाताई घुले व वडील गहिनीनाथ घुले यांनी धार्मिक पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याची माहिती दिली.
या प्रसंगी कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. बहुजन शक्ती न्यूज पोर्टल चॅनेलच्या वतीने शिव व तेज यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.




















