शिर्डी : दिलीप गायकवाड
महाराष्ट्र राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर असलेले नरेंद्र पाटील (अध्यक्ष, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ) यांनी शिर्डी येथे भेट देत श्री साईबाबा समाधी मंदिर येथे श्री साईबाबांचे दर्शन घेतले.
यानंतर छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या वतीने त्यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सध्या बंद असलेले पोर्टल तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मराठा समाजातील तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सकारात्मक चर्चा झाली. नरेंद्र पाटील यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सत्कार समारंभास प्रदीप कोते, संदीप वाघ, बाळासाहेब काळे, अनिल मलदोडे, नितीन अनारसे, उमेश भराटे, सचिन सोळसे, सुशांत गायकवाड, शुभम नलावडे, यश पोहेकर आदी उपस्थित होते




















