Homeताज्या बातम्यासायन प्रतीक्षानगर वॉर्ड १७३ मध्ये नवा ट्विस्ट....

सायन प्रतीक्षानगर वॉर्ड १७३ मध्ये नवा ट्विस्ट….

शिवसेना शिंदे गटातून पूजा रामदास कांबळे रिंगणात?

मुंबई, दि.१७ : मंगेश म्हात्रे

सायन प्रतीक्षानगर वॉर्ड क्रमांक १७३ महिलांसाठी राखीव घोषित झाल्यानंतर स्थानिक राजकारणातील घडामोडीना वेग आला असून असून भाजप, शिवसेना (ठाकरे गट ) आणि शिवसेना (शिंदे गट ) गटांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटातून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा रामदास कांबळे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनंतर वॉर्ड १७३ मध्ये नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

सायन-कोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ पवार यांच्या फेसबुक पोस्टमुळे आधीच चर्चा तापल्या असताना शिंदे गटातील हालचालींना आता अधिक वेग आला आहे. पवार यांनी त्यांच्या सुन निकिता पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर शाखा संघटीका वैजयंती घाडगे याही इच्छुक असून, या तिघींच्या स्पर्धेमुळे शिवसेना शिंदे गटात चुरस तीव्र झाली आहे.

२०१८ च्या पोटनिवडणुकीत याच वॉर्डातून विजय मिळवलेल्या रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळेंचे नाव पुढे येताच समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांना या वॉर्डातून तब्बल ४८०० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपचा या वॉर्डातील प्रभावदेखील लक्षणीय आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराबाबत स्पर्धा निर्माण झाली असून भाजपसोबत युती होणार की स्वबळावरची लढत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडूनही येथे तगडे आव्हान उभे राहू शकते. शिवसेना–मनसे युती झाल्यास मराठी मतांचे समीकरण बदलू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

स्थानिक पातळीवरील अंतर्गत स्पर्धेमुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार हे निश्चित असून, वॉर्ड १७३ मध्ये शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी अखेर कोणाच्या वाट्याला जाणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!