Homeताज्या बातम्यासोनई येथील घटनेच्या निषेधार्थ सोनई ते लोणी पदयात्रेचे आयोजन — ॲड. नितीन...

सोनई येथील घटनेच्या निषेधार्थ सोनई ते लोणी पदयात्रेचे आयोजन — ॲड. नितीन पोळ

अहिल्यानगर,दि.२४(चंद्रकांत जोर्वेकर )

सोनई येथे मातंग समाजातील तरुणावर झालेल्या जातीयवादी प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने सोनई ते लोणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी दिली.

या संदर्भातील निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले असून, या पदयात्रेचे आयोजन ३० ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान करण्यात येणार आहे.

ॲड. पोळ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सोनई (ता. राहुरी) येथील समाजबंधू संजय वैरागळ याच्यावर ऐन दिवाळीच्या सणात जीवघेणा जातीय हल्ला झाला असून, घटनेनंतरही आरोपी मोकाट आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”

पुढे ते म्हणाले की, अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही अशी घटना घडल्याने समाजमन संतप्त झाले आहे.

ही पदयात्रा लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲड. नितीन पोळ यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.

दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी सोनई येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. यात्रेदरम्यान गावागावात समाज बांधवांना मानसिक आधार देण्यात येईल.

दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी लोणी येथे पदयात्रेचा समारोप होणार असून, पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून खालील मागण्यांचे निवेदन देण्यात येईल —

सोनई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे.

अहमदनगर जिल्हा “दलित अत्याचारग्रस्त जिल्हा” म्हणून घोषित करावा.

या पदयात्रेत लोक स्वराज्य आंदोलनासोबत समविचारी संघटना सहभागी होणार असून, जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. नितीन पोळ यांनी केले आहे.

प्रतिनिधी,चंद्रकांत दुर्वेकर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!