कोपरगाव,दि.२६ : विजय हलवाई
कोपरगाव तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमाती क्रमांक ३६ मध्ये आरक्षणाची तरतूद असतानाही मागील ७५ वर्षांपासून त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन करावा लागत असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.
या अन्यायाविरोधात जालना येथे धनगर समाजाचे संघर्षयोद्धा दिपक बोराडे मरणोपोषणाला बसले आहेत. मात्र शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली.
धनगर समाजाने शासनाला इशारा दिला असून, आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा
किरण थोरात,अतुल शेळके,प्रकाश करडे ,प्रभाकर शिंदे,पंकज शिंदे,अमोल बाचकर,वसंत शेळके,विठ्ठल मैंदाड,जालिंद्र शेळके,अनिल क्षिरसागर,अशोक घोलप,दीपक ढोणे, विजय हालनोर, दिनेश शिंदे, संतोष चांडे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.




















