कोपरगाव, दि.७.( दिलीप गायकवाड )
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मागासवर्गीय समाजाच्या वतन, इनाम व खाजगी जमिनी बेकायदेशीररित्या लाटल्याचा गंभीर आरोप बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे नेते व कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड यांनी केला आहे.
गायकवाड यांनी म्हटले आहे की, काही प्रभावशाली राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हाताशी धरून दलित समाजाच्या जमिनींवर बेकायदेशीर व्यवहार केले आहेत. जेऊर कुंभारीसह अनेक गावांतील दलीत समाजाच्या जमिनी खोट्या तक्रारी दाखल करून व दबाव टाकून हस्तगत केल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित राजकारणी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. तसेच, राजकीय नेत्यांनी अशा अन्यायाला थारा देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.




















