Homeताज्या बातम्यागुन्हेगारीला लगाम, अवैध धंद्यांना थारा नाही...!

गुन्हेगारीला लगाम, अवैध धंद्यांना थारा नाही…!

कोपरगांवात सुरक्षिततेची भावना निर्माण करू – प्रभारी अधिकारी रामकृष्ण कुंभार

कोपरगांव, दि.१७ ( दिपक साटोटे )

“कोपरगांव शहरात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाही. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही गय दिली जाणार नाही,” असा ठाम इशारा कोपरगांव पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी अधिकारी रामकृष्ण म. कुंभार यांनी दिला आहे.

कुंभार यांनी नुकताच कोपरगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. या निमित्ताने बहुजन शक्ती न्यूजचे कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड आणि पत्रकार दीपक साटोटे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना प्रभारी अधिकारी कुंभार म्हणाले, “शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे पोलीस दलाचे प्राथमिक कर्तव्य आहे. पोलिसांवर नागरिकांचा विश्वास वाढावा, यासाठी पारदर्शक आणि कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येक नागरिकाचा सन्मान राखत, कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे कार्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.”

कुंभार,पुढे म्हणाले, “शहरात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य, समाजविघातक कृत्य किंवा अवैध व्यवसाय सहन केला जाणार नाही. गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.”शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही प्रभारी अधिकाऱ्यांनी दिली.”

नवीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या आगमनाने शहरातील जनतेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, पोलीस यंत्रणेबाबतचा विश्वास अधिक दृढ होत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिकांतर्फेही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

“शहरातील नागरिकांनी सुरक्षिततेचा विश्वास ठेवावा, हे पोलीस विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखता येतो. त्यामुळे जनतेने कोणतीही अडचण असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, आम्ही तत्परतेने मदतीसाठी उपलब्ध आहोत.”असे आवाहन त्यांनी कोपरगावातील जनतेला केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!