Homeताज्या बातम्यापुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर परिसरात घडली. पुणे-सातारा रस्त्यावरील राजर्षी शाहू बँकेसमोरील हॉटेलबाहेर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील टोळीयुद्ध पुन्हा पेटल्याची चर्चा सुरू झाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर खून प्रकरणात अक्षयचा भाऊ आकाश म्हस्के याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे या जुन्या वैमनस्यातूनच अक्षयवर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बुधवारी सकाळी अक्षय म्हस्के हा नाश्त्यासाठी बालाजीनगर परिसरात आला होता. राजर्षी शाहू बँक चौकात तो थांबलेला असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक पिस्तुलातून गोळीबार केला. यातील एक गोळी त्याच्या पायात घुसली. त्यानंतरही हल्लेखोरांचा संताप शांत झाला नाही. त्यांनी अक्षयवर कोयत्याने वार करत परिसरात दहशत निर्माण केली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

“प्राथमिक चौकशीत वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत,” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पुण्यात काही महिन्यांपासून गँगवॉरच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून, भरदिवसा होणाऱ्या हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!