Homeताज्या बातम्याकडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा,...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत 25 वी ट्रान्सफर!

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मंगेश म्हात्रे

आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही तब्बल 25 वी बदली ठरली आहे. त्यामुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. काही आठवड्यांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली होऊनही प्रत्यक्ष रुजू होण्याची संधी न मिळालेल्या मुंढे यांना अखेर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या FDA विभागाची जबाबदारी देण्यात आली.

याआधी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी लाभ घेणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम उघडली होती. आता लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या FDA विभागात त्यांची एन्ट्री झाल्याने प्रशासनात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, औषध विक्रेत्यांनी बुधवारी आंदोलनाची हाक दिलेली असतानाच नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या मुंढे यांची नियुक्ती अधिकच महत्वाची मानली जात आहे.

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • संजय खंदारे यांच्याकडे FDA विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
  • श्रीधर डुबे यांची SRA, ठाणे येथे बदली
  • बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषद CEO पदी नियुक्ती
  • कान्हूराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या MD पदी बदली
  • आर. एस. चव्हाण यांची हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या MD पदी नियुक्ती

“कडक शिस्त, धडाकेबाज निर्णय आणि सततच्या बदल्या” यामुळे ओळखले जाणारे तुकाराम मुंढे आता FDA मध्ये काय मोठे निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!