Homeताज्या बातम्याचेंबूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मानवी साखळीचे आयोजन...

चेंबूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मानवी साखळीचे आयोजन…

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला गती देण्यासाठी रविवार, दिनांक २९ जून रोजी सकाळी १० वाजता चेंबूर पश्चिम येथील पी.एल. लोखंडे मार्गावर मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महाबोधी महाविहारचा ताबा बौद्ध समाजाकडे देण्यात यावा आणि बी.टी. ॲक्ट १९४९ हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी समितीची मागणी आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, मंदिर हिंदू समाजाच्या, मस्जिद मुस्लिम समाजाच्या, चर्च ख्रिश्चन समाजाच्या, तर गुरुद्वारा शीख समाजाच्या ताब्यात असताना, बौद्ध समाजाच्या सर्वात पवित्र असलेल्या महाबोधी महाविहाराचा ताबा अद्याप बौद्ध समाजाकडे नाही, हे गंभीर अन्याय असून तो दूर करणे गरजेचे आहे.

या आंदोलनाचे नियोजन शरद शेळके, प्रवीण बागूल, विनोद पवार आणि आकाश साळवे यांनी केले आहे. विविध बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळीआंदोलना विषयी बोलताना प्रविण बागुल यांनी सांगितले की, “महाबोधी महाविहार हा बौद्ध धर्मीयांचा जागतिक वारसा असून, त्याचा ताबा बौद्ध समाजाकडे असणे ही नैतिक आणि धार्मिक गरज आहे. सरकारने याबाबत त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्ण मानवी साखळी आंदोलन करण्यात येत असून, पुढील टप्प्यात व्यापक जनजागृती आणि आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!