वंदना गेवराईकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक चर्चा
मुंबई, दि.१३ : अजय मगरे
एसआरए योजनेत असहकार्य करणारे गायबान शाह आणि ओम श्री जनाबाई एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडीधारकांविरुद्ध एसआरए कार्यालयात आज सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी संस्थांचे अध्यक्ष, खजिनदार, विकासकांचे प्रतिनिधी, झोपडीधारक तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान झोपडीधारकांना प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन भाडे व्यवस्थापन प्रणाली, तसेच विकासकांसोबत करण्यात येणाऱ्या वैयक्तिक करारनाम्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर अपात्र झोपडीधारकांच्या पात्रतेसंदर्भातील तक्रारी, तसेच इतर प्रश्नांवर प्रत्यक्ष ऐकून घेत चर्चा करण्यात आली.
झोपडीधारकांच्या तक्रारींची दखल घेत प्राधिकरणाने आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना निर्देश दिले असून, प्रलंबित प्रकरणांच्या निरसनाला गती मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.




















