Homeताज्या बातम्याड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ लागू होणार:मुख्यमंत्र्यांची घोषणा

ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ लागू होणार:मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि.२ ( प्रतिनिधी )

अंमलीपदार्थांच्या तस्करीवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्याअंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीनावर सुटल्यावर पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या विरोधात आता ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके व एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे विधिमंडळ अधिवेशनातच संबंधित कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आले असून त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.”

केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे राज्यस्तरीय व आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व राज्यांमध्ये ‘इंटेलिजन्स’ शेअरिंग सुरु असून त्यामुळे तस्करांविरुद्ध समन्वयाने कारवाई शक्य झाली आहे.

व्यसनमुक्तीसाठी अधिक सक्षम केंद्रांची गरज लक्षात घेता, सध्या सुरू असलेल्या केंद्रांची गुणवत्ता वाढवून नवीन दर्जेदार व्यसनमुक्ती केंद्रांची उभारणी करण्याचे धोरण तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

गांजाच्या शेतीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “गांजाची शेती महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही कायदेशीर नाही. गांजा, गुटखा किंवा तत्सम अंमलीपदार्थांची तस्करी होत असल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!