Homeताज्या बातम्यादिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस पावले..

दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस पावले..

दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित — तुकाराम मुंढे

मुंबई, दि. २ : दिलीप गायकवाड

दिव्यांग व्यक्तींचे हक्क, सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत कलम ७९ ते ८३ नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांना “राज्य आयुक्त” म्हणून अधिसूचित करण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. या अधिकारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.

राज्य आयुक्तांना कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास किंवा स्वतःहून ( सु मोठो ) कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. दिव्यांगांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही अथवा निर्देश देण्याचा अधिकार त्यांना आहे. कलम ८२ नुसार राज्य आयुक्तांना दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार दिले गेले आहेत. साक्षीदारांना समन्स बजावणे, कागदपत्रे मागविणे, शपथपत्रांवर पुरावे स्वीकारणे तसेच तपासणी आयोग नेमण्याचे अधिकार त्यात समाविष्ट आहेत.

राज्य आयुक्तांकडे दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतात. तक्रार आल्यानंतर १५ दिवसांत प्रतिवादीकडून उत्तर मागविले जाईल व ३० दिवसांत सुनावणी पूर्ण केली जाईल. प्रतिवादी अनुपस्थित राहिल्यास आयुक्तांना एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकार असेल.

राज्य आयुक्तांच्या शिफारशींवर संबंधित प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक असेल. कार्यवाहीचा अहवाल किंवा नकाराची कारणमीमांसा ९० दिवसांत सादर करावी लागेल. नकाराचे कारण असमर्थनीय असल्यास राज्य आयुक्त शासनाकडे अहवाल पाठवतील.

राज्य आयुक्तांनी मागितलेली माहिती किंवा अनुपालन अहवाल सादर करणे सर्व अधिकारी व प्राधिकरणांना बंधनकारक आहे. निर्देशांचे पालन न केल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दंडात्मक कारवाई तर होईलच, पण त्यानंतरही दुर्लक्ष झाल्यास प्रशासकीय आणि शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!