Homeताज्या बातम्यानवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – चंद्रकांत पाटील

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.१५ : अजय मगरे

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे युवा पिढीचे भवितव्य घडवणारे, व्यावहारिक आणि सर्जनशीलतेला उत्तेजन देणारे आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित ‘नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर’ या युएएफ एक्सपोचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. डिझाईन क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा संगम दाखवण्यासाठी हा एक्सपो आयोजित करण्यात आला.

मंत्री पाटील म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरणात संशोधनावर विशेष भर देण्यात आला आहे. नवउद्योजक आणि स्टार्टअप्सना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच बाजारपेठ निर्मितीसाठी शासन विशेष मदत करत आहे. त्यामुळेच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत जगात आघाडीवर पोहोचला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “उर्मीजच्या कला मंचातर्फे आयोजित एक्स्पोमुळे एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शन, करिअर समुपदेशन, विद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवादाची मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरेल.

डिझाईन—कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम

मुलांच्या सर्वांगीण विकासात कला आणि सर्जनशीलतेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. “डिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित नसून विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा परिपूर्ण समन्वय साधणारे मोठे व्यावसायिक क्षेत्र बनले आहे,” असे ते म्हणाले.

अभियांत्रिकी, वास्तुकला, उत्पादन, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, डिजिटल कंटेंट आदी सर्व क्षेत्रांत डिझाईन थिंकिंग हा नवोपक्रमाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय), एआर/व्हीआर यासारख्या आधुनिक अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट-आधारित, हँड्स-ऑन शिक्षण देण्यावर भर देण्यात येत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!