Homeताज्या बातम्याकाँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर…

चेन्नीथला, सपकाळ, वडेट्टीवार, वासनिक , बाळासाहेब थोरात यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा समावेश

मुंबई, दि. १५ : अजय मगरे

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची भक्कम यादी जाहीर केली आहे. प्रचारमोहीमेला वेग देण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, खासदार-आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या जाहीर केलेल्या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रमुख समावेश आहे.

याशिवाय, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, तसेच खा. रजनीताई पाटील, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, आ. डॉ. नितीन राऊत, आ. अमित देशमुख, सुनिल केदार, आ. अस्लम शेख, डॉ. विश्वजित कदम, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

तसेच, संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे सचिन सावंत, अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एससी विभागाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादल अध्यक्ष विलास औताडे आणि एनएसयूआईचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

या दमदार यादीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसकडून जोमदार आणि प्रभावी प्रचार मोहीम उभारली जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!