मतदार दुसऱ्याच प्रभागात,नागरीकांसह राजकीय पक्ष त्रस्त,
पैठण,दि.१० (अभिजित सोनवणे )
पैठण ता; प्रतिनिधी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरातील १२ प्रभागांची प्रारुप यादी ८ ऑक्टोंबर रोजी नगरपरिषद प्रशासनाने जाहीर केली. मात्र या यादीत घोळच,घोळ असल्याचे दिसून येत आहे. यादीतील मतदान दुसर्यांच प्रभागात गेल्याने नागरिकांसह राजकीय नेते व पक्ष कमालीचे त्रस्त झाले आहेत.
या यादीत अनेक त्रुटी चुकीची नावे आणी विस्कळीत प्रभागीय वर्गीकरण समोर आल्याने नागरिक आणी राजकीय नेते व पक्ष दोन्ही ही चक्रावले आहेत. काही नागरिकांची नावे पुर्णपणे गायब आहेत, तर अनेकांचे पत्ते बदलुन ते ईतरच प्रभागांमध्ये दाखल झालेले दिसत आहेत. या गोंधळामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे मतदार प्रारूप यादीत अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या प्रभागात दाखवले गेले आहेत. मतदार नेहरूचौक प्रभागातील असुन त्यांची काही नावे भाजी मार्केट, जोहरीवाडा किंवा परदेशीपुरा प्रभागात तर काहींची नावे पुर्णपणे वगळली आहेत.
निवडणुक पुर्व गोंधळामुळे नागरीकांचा संताप!
(पैठणकर)
आम्हाला मतदानाचा अधिकार आहे.पण मतदार यादीच चुकीची असेल तर आम्ही मतदान कसे करू? असा सवाल शहरातील अनेक नागरिकांनी केला आहे.निवडणुक आयोगाने आणी जिल्हा प्रशासनाने या घोळांची दखल घेऊन तातडीने तपास करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.)
(राजकीय पक्षांनी घेतली तातडीची बैठक; )
मतदार यादीतील गंभीर चुका लक्षात येताच विविध राजकीय पक्षांनी तातडीच्या बैठका घेतल्या. मतदारसंघातील बदलांमुळे सभांव्य उमेदवाराच्या गणीतावरही परीणाम झाला आहे.अनेक पक्षांनी या घोळामुळे निवडणूकीच्या तयारीत अडरळे निर्माण झाल्याचे सांगितले आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे लेखी आक्षेप नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.नागरीकांचे म्हणणे आहे की, प्रत्येक निवडणुकीचा आधी असाच गोंधळ निर्माण केला जातो.आणी शेवटी अनेक मतदार हे मतदानापासून वंचीत राहतात.




















