पैठण,दि.१० ( अभिजीत सोनवणे )
दावरवाडी ता: प्रतिनिधी हर्षी ता पैठण येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि.९ ) रोजी शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवुन कौशल्य सादर केले. यामध्ये ज्वालामुखी उद्रेक या प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवले. हा प्रयोग सादर करणार्या विद्यार्थांचे शिक्षक व पालकांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप रासणे ,आत्माराम गोर्डे, दिलीप छबीलवाड,भारती सोळंके, माधुरी रोडे, गजानन नेहाले, संजय पाटील, विद्यार्थी ज्ञानेश्वर घायाळ, सार्थक घायाळ, रुद्र घायाळ,आदीसह विद्यार्थी उपस्थित होते..




















