Homeताज्या बातम्याप्रतीक्षा नगरात ठाकरे गटाची ‘निष्ठावंत’ रणनीती; भाजप-शिंदे गटाला आव्हान..

प्रतीक्षा नगरात ठाकरे गटाची ‘निष्ठावंत’ रणनीती; भाजप-शिंदे गटाला आव्हान..

मुंबई, दि.१० : मंगेश म्हात्रे

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा प्रतीक्षा नगर पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. १९९३ पासून सातत्याने या विभागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. मा.शाखाप्रमुख प्रकाश वाघधरे आणि मा. नगरसेवक मंगेश सातमकर या जोडगोळीने तब्बल तीन दशके प्रतीक्षा नगरवर वर्चस्व राखले होते.

मात्र वाघधरे यांच्या निधनानंतर स्थानिक शिवसेनेत फूट पडली, अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला, तर २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. २०२५ मध्ये माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचाही शिंदे गटात प्रवेश झाल्याने ठाकरे गट नेतृत्वहीन झाल्याचे चित्र काही काळ दिसले.

मात्र या संघर्षाच्या काळात माजी नगरसेविका प्रणिता वाघधरे, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले आणि शाखाप्रमुख संजय म्हात्रे यांनी ठाकरे गटाची मशाल धगधगत ठेवली. आगामी महापालिका निवडणुकीत या तिघांचे, तसेच सहसंघटक प्रशांत भिसे यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

प्रणिता वाघधरे यांना माजी शाखाप्रमुख प्रकाश वाघधरे यांच्या पुण्याईचा लाभ होऊ शकतो.महापालिकेतील कामाचा अनुभव आणि भाषण कौशल्य जमेची बाजू असली तरी वाघधरे यांना मानणारा मोठा वर्ग प्रतीक्षा नगर मध्ये कार्यरत आहे. इतर पक्षातलं अदृश्य सहकार्य प्रणिता वाघधरे यांचं राजकीय समीकरण अधिक बळकट करणार आहे.

प्रभाकर भोगले हे निष्ठावंत चेहरा म्हणून पुढे येत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेत कोणतेही मोठे पद नसतानाही आंदोलनातं माध्यमातून स्थानिक प्रश्न मांडत राहिले आहे. लढणारे भोगले यांनी परिणामांची तमा न बाळगता फुटीर नगरसेवकांना जाब विचारायलाही मागे पुढे पाहिलेले नाही, त्यामुळे स्थानिक आणि ठाकरे गटाच्या सहानुभूती लाटेचा फायदा त्यांना होऊ शकतो.

संजय म्हात्रे यांचा शांत आणि संयमी स्वभाव पक्षश्रेष्ठींसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतो, तर वार्ड अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव झाल्यास प्रशांत भिसे यांच्या नावावर विचार होऊ शकतो.

प्रतीक्षा नगरमधील आगामी निवडणुकीत भाजप व शिंदे गट आव्हान असले तरी,निष्ठावंतांच्या एकजुटीवर ठाकरे गटाची राजकीय मशाल कायम राहते का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!