Homeताज्या बातम्याभारनियमन थांबवा; खिर्डी गणेश सब स्टेशनवर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करा...

भारनियमन थांबवा; खिर्डी गणेश सब स्टेशनवर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करा…

आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास सब स्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा

कोपरगाव : दिलीप गायकवाड

ग्रामीण भागातील वाढते भारनियमन तातडीने थांबवून विद्यार्थ्यांसाठी खिर्डी गणेश सब स्टेशन परिसरात अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी नाटेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आठ दिवसांनंतर खिर्डी गणेश सब स्टेशनला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू होऊन महिनाभर उलटला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने सोयाबीन, मका आदी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरीतील उपलब्ध पाण्यावर स्प्रिंकलरद्वारे सिंचन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत नाटेगाव, येसगाव, खिर्डी गणेश, अंचलगावसह परिसरात वाढविण्यात आलेल्या भारनियमनामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

दरम्यान, शाळा सुरू झाल्याने सततच्या वीजखंडितीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे. त्यामुळे भारनियमनाचा कालावधी कमी करून उच्च दाबाने नियमित वीजपुरवठा करावा. तसेच सब स्टेशन परिसरात २४ तास वीज उपलब्ध असल्याने तेथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर बाळासाहेब रंगनाथ मोरे, गणेश वसंत मोरे, सौरभ वर्पे, अभिजित मोरे, लक्ष्मण मोरे, जालिंदर मोरे, पांडुरंग तांबे, ऋषिकेश मोरे, बापू नरोडे, संदीप शिंदे, सचिन पोळ, मच्छिंद्र मोरे, सोपान मोरे, गणेश मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच नाटेगाव ग्रामपंचायतीनेही भारनियमनाची वेळ बदलून नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

CoEP फ्लायओव्हर ट्रॅफिक चाचणीने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली कारण गर्दी बदलते, कमी होत नाही...

पुणे : वाहतूक पोलिसांनी वाहनांच्या प्रवाहाचे नियमन करण्यासाठी CoEP उड्डाणपुलाखालील रस्ता अडवल्यानंतर अनेक महिन्यांनंतर संचेती जंक्शनजवळ प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे....

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन. Pune News

पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो. पुणे बातम्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी...

error: Content is protected !!