गुन्हेगारी आळा घालण्याच्या भूमिकेचे स्वागत
कोपरगांव, दि.१७ ( दिलीप गायकवाड )
कोपरगांव पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी अधिकारी रामकृष्ण म. कुंभार यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कोपरगांव शहराचे अध्यक्ष संदीप निरभवणे, उपाध्यक्ष सचिन त्रिभुवन व शहर सरचिटणीस जतिन निरभवणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
या भेटीत गौरव पानगव्हाणे व अल्तमश सय्यद हे कार्यकर्तेही उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कोपरगांवमधील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले.
भेटीदरम्यान प्रभारी अधिकारी रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले की, “शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे पोलीस विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.” असे सांगत कोपरगाव नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.




















