Homeताज्या बातम्याम्हाडामध्ये पुन्हा एकदा बनावट पावत्यांचा घोटाळा — लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफास

म्हाडामध्ये पुन्हा एकदा बनावट पावत्यांचा घोटाळा — लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफास

मुंबई, दि. १७ ( मंगेश म्हात्रे )

म्हाडाच्या मुंबई मंडळात पुन्हा एकदा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. यापूर्वीच बनावट भू-भाडे पावत्यांच्या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असताना, आता गृहनिर्माण संस्थांच्या भाडेपट्टा व अभिहस्तांतरण करारात बनावट पावत्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसुली गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

म्हाडामध्ये दररोज विविध अर्जदारांकडून शुल्काच्या रकमा जमा होतात. या रकमा भरल्यानंतर अधिकृत पावती दिली जाते, जी पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी सादर केली जाते. मात्र अलीकडे लेखा विभागाने केलेल्या अंतर्गत पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली आहे – काही प्रकरणांमध्ये पावती असूनही संबंधित रक्कम म्हाडाच्या खात्यात जमा झालेली नाही.

बोरीवली विभागातील एका गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणात तब्बल ₹५७ लाखांची बनावट पावती आढळून आली आहे. पावतीवर नमूद असलेल्या दिवशी म्हाडाच्या बँक खात्यात अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नव्हती, अशी अधिकृत तपासणीत स्पष्ट झालं आहे.

या घोटाळ्यामुळे म्हाडाच्या आर्थिक प्रक्रियेवर, पारदर्शक कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, लेखा विभागाची खातरजमा होण्याआधीच काही फायली मंजूर झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण गुप्त ठेवण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “बोगस पावतीच्या प्रकरणाची मला अद्याप माहिती नाही. तपशील घेतल्यानंतरच सांगता येईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!