Homeताज्या बातम्यासर्व घटकांना न्याय देणे हीच आमची बांधिलकी" –रामदास आठवले

सर्व घटकांना न्याय देणे हीच आमची बांधिलकी” –रामदास आठवले

ठाणे, दि. २६ ( अजय मगरे )

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “सर्व घटकांना समान न्याय मिळावा, हीच आमची भूमिका असून त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत राहणार आहोत.”

या संवादादरम्यान आठवले यांनी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याणाच्या विविध योजना, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. “देशात सामाजिक समतेसाठी कार्यरत असलेल्या सरकारने समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी अनेक योजना राबवल्या असून त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत ठाणे जिल्ह्यातील विकासकामे, दलितांवरील अत्याचार, आगामी निवडणुका तसेच आरक्षणासंबंधीचे मुद्दे यावरही प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांना उत्तर देताना आठवले म्हणाले, “रिपब्लिकन पक्ष हा केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देणे हीच आमची प्राथमिकता आहे.”

या वेळी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे
ठाणे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे,कार्याध्यक्ष प्रल्हादजी मगरे, युवक अध्यक्ष विनोद भालेराव, महासचिव प्रमोद इंगळे, प्रसिद्धीप्रमुख तात्याराव झेंडे, उपाध्यक्ष शहाजी दुपारगुडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष बबन केदारे, महिला उपाध्यक्ष विमल सातपुते, सुमन ताई इंगळे, महासचिव अशोक कांबळे, युवराज वावळ व मगरे परिवार आरपीआय निरीक्षक साहेबराव सुरवाडे, मनीषाताई करलादस्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आठवले यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधून अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!