कोपरगाव, दि.१९ : चंद्रकांत जोर्वेकर
कोपरगाव नगरपालिकेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह-संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून कोपरगावच्या राजकीय वातावरणाला मोठा कलाटणी दिली. पक्षश्रेष्ठींनी सर्वांचे स्वागत करत आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
झावरे यांच्या प्रवेशानंतर कोपरगावमध्ये शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरत आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उप शहरप्रमुख विकास शर्मा, शेखर कोलते, बाळासाहेब साळुंखे, राहुल देशपांडे, अमजद शेख, सतीश शिंगणे, वैभव गीते, विजय सोनवणे, विजय शिंदे, वर्षाताई शिंगाडे, सलीम कांदेवाले, अरुण बोर्डे यांसह श्रीरामपूरचे दत्तात्रय खेमकार, शिरूरच्या रोहिणी बनकर, सुनील बाफना, किरण बनकर तसेच तळेगाव दाभाडे येथील लीना कामत यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला.
या सामूहिक प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचा उमेद वाढल्याचे चित्र दिसत आहे.




















