Homeताज्या बातम्याकागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासु...

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासु…

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसचे पुन्हा आंदोलन*

ठाणे,दि.१२. ( अजय मगरे )

ठाणे काँग्रेसने काही दिवसापूर्वी ठाणे महापालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने कागदी घोडे (पत्र) नाचवुन खाजगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.मात्र, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झालेली नसुन शिक्षण विभागाच्या या दुर्लक्ष्या विरोधात काँग्रेसने बुधवारी पुन्हा आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी, शिक्षण विभागाच्या आधिकाऱ्याना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळाच्या इमारतींची दयनीय अवस्था यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले होते. परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण विभागाकडे केवळ एकच पर्यवेक्षक असल्याने व या पूर्वीच्या शिक्षण उपायुक्तांनी भरारी पथक नेमण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची तसेच अन्य आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने खाजगी शाळांवर नियंत्रणच ठेवता येणार नाही. असे असताना शिक्षण मंडळाने दिखाव्यापुरते पत्र देऊन आपले हात झटकल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा, शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागल्याचे यावेळी सांगितले.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, अर्थतज्ञ विश्वास उटगी,प्रदेश सचिव मधु मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनावेळी वेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शालेय शिक्षण व्यवस्थेतील ढासळलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा न मिळणे, शिक्षकांची रिक्त पदे यासह इतर प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे,रविंद कोळी, स्मिता वैती,निशिकांत कोळी,राजू शेट्टी,जावेद शेख,अंजनी सिंग,सुरेश भोईर,अब्बास भाई,श्रीरंग पंडित,निलेश पाटील,आनंद सांगळे,शीतल अहेर,शांती एलावडेकर,संगीता कोटल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!