Homeताज्या बातम्याकोपरगावात दोन्ही काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र मैदानात!

कोपरगावात दोन्ही काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र मैदानात!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकजुटीने लढवणार — नितीन शिंदे व ॲड. संदीप वर्पे यांची माहिती

कोपरगाव, दि. ३१ : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते व तालुकाध्यक्ष नितीनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपराव वर्पे यांनी काँग्रेस नेते मा. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली.

निवडणुकीत उबठा पक्ष स्वतंत्र पद्धतीने उतरण्याच्या हालचाली करत असल्याने, दोन्ही काँग्रेस गटांनी एकत्र राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदे व वर्पे यांनी दिली. “उबठा पक्ष बेडूकूळ्या काढत असून, कोणताही ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे आम्ही ठामपणे एकत्र येऊन सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत,” असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व स्तरांवर म्हणजे नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. उमेदवारांची चाचपणी जवळपास पूर्ण झाली असून, आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थोरात साहेब व पवार साहेब ठरवतील. पंचायत समिती व जिल्हा परिषदेबाबतचा निर्णय वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशानुसार घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उबठा पक्षातील नेते मंडळी कोणतीही सकारात्मक चर्चा करण्यास तयार नसल्याने दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र राहण्याचा निर्णय ठाम झाला आहे. त्यामुळे या वेळी कोपरगाव तालुक्यातील निवडणूक रंगतदार होणार असून राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय पातळीवर सध्या चर्चेला उधाण आले असून, कोपरगाव तालुक्यातील जनता “उबठा पक्ष स्वतंत्र लढणार की दोन्ही काँग्रेससोबत जाऊन लढणार?” याकडे उत्सुकतेने पाहत आहे.दरम्यान, भाजप युतीविषयी लोकांमध्ये रोष कायम असल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येते. तसेच काळे व कोल्हे गट ही निवडणूक एकत्र लढवणार की स्वतंत्र? याकडेही कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे.

सध्या कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यावेळची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!