Homeताज्या बातम्याकोपरगाव इरिगेशन कार्यालयातील गोडाऊनला भीषण आग;

कोपरगाव इरिगेशन कार्यालयातील गोडाऊनला भीषण आग;

महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची चर्चा

कोपरगाव, दि.१८.दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील येवला रोडवरील महाराष्ट्र शासनाच्या गोदावरी डावा तट कालवा (जलनिस्सारण) उपविभागाच्या इरिगेशन कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या गोडाऊनला आज पहाटे अचानक आग लागून ते पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास गोडाऊनमधून धूर व ज्वाळा दिसून आल्या. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला कळविले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत गोडाऊनमधील साहित्य भस्मसात झाले होते.
या आगीत नेमके किती नुकसान झाले, कोणते साहित्य किंवा कागदपत्रे जळाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र गोडाऊनमध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली, अपघात होता की घातपात, याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून घटनेचा तपास सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा कोपरगावात सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!