Homeताज्या बातम्याकोपरगाव शहरात लिप्पगं रोगाने जनावरे त्रस्त; उपचाराकडे दुर्लक्ष

कोपरगाव शहरात लिप्पगं रोगाने जनावरे त्रस्त; उपचाराकडे दुर्लक्ष

नागरिकांकडून नगरपरिषद व पशुवैद्यकीय विभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी

कोपरगाव,दि. १२ : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यासह शहरात लिप्पगं रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक गाय, वासरे आणि इतर जनावरे या रोगाने बाधित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध रस्त्यांवर या आजाराने त्रस्त जनावरे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत, परंतु स्थानिक प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आजारी जनावरांच्या अंगावर जखमा होऊन रक्त वाहते, माशा घोंगावत असतात आणि ती वेदनेने व्याकुळ होत रस्त्यावर फिरतात, अशी करुण स्थिती शहरातील विविध भागांमध्ये दिसून येत आहे. या मुक्या जीवांच्या वेदना कोणालाच जाणवत नाहीत, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोपरगाव शहरात नगरपरिषद अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच अनेक गौरक्षक संस्था कार्यरत असून, अशा वेळी त्यांनी पुढाकार घेऊन आजारी जनावरांवर उपचार आणि लसीकरण मोहिम राबवावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनी सांगितले की, “नगरपरिषदेकडे आरोग्य विभाग आहे, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत; तरीही रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांकडे कुणाचेच लक्ष नाही. या जनावरांना उपचार मिळणे ही मानवी जबाबदारी आहे.”

याबाबत नगरपरिषद व पशुवैद्यकीय विभागाने तातडीने लक्ष घालून आजारी जनावरांच्या उपचारासाठी पथके नियुक्त करावीत, अशी मागणी नागरिक, समाजसेवक आणि गौरक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेती वाढवायची असेल तर आधी उद्योग वाढला पाहिजे – राम भोगले

‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियानाचा प्रारंभ; पाच वर्षे दर दोन महिन्यांनी उपक्रम छत्रपती संभाजीनगर : अजय मगरे “शेती वाढवायची असेल, तर आधी उद्योग वाढला पाहिजे. खते, बियाणे,...

शेतीत कष्ट करणाऱ्या महिलांना आता ‘शेतकरी’ म्हणून मान्यता..

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू मुंबई : अजय मगरे शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी...

अंबिका नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; नागरिकांचा संताप

ठाणे, दि.१७.( अजय मगरे ) अंबिका नगर नं. २, शिवराय गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू 

१७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्ण   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे दरम्यान पहिली दैनंदिन थेट...

क्यूआर कोडधारक फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा..

जनवादी हॉकर्स सभेची पालिका आयुक्तांकडे मागणी; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचीही मागणी मुंबई : अजय मगरे मुंबई महापालिकेने २०१४च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रे देऊन...

error: Content is protected !!