Homeताज्या बातम्यादहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रु-मार्च २६ मध्ये; विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रु-मार्च २६ मध्ये; विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि.१४ : अजय मगरे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी (एस.एस.सी.) व बारावी (एच.एस.सी.) परीक्षांच्या प्राथमिक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत (पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण) या परीक्षा एकाच वेळापत्रकानुसार पार पडतील.

बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेच्या लेखी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देखील याच कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या लेखी परीक्षा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी संपणार आहेत.

प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारीतच

बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार, दि. २३ जानेवारी ते सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येतील. तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सोमवार, दि. २ फेब्रुवारी ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडतील. या कालावधीत शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र तसेच माहिती तंत्रज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आगाऊ जाहीर

राज्य मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रम नियोजन सुलभ व्हावे आणि विद्यार्थ्यांवरील परीक्षा ताण कमी व्हावा या उद्देशाने हे वेळापत्रक आगाऊ जाहीर केले आहे.

अंतिम विषयवार वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

error: Content is protected !!