Homeताज्या बातम्यानांदर गणात अनिल बोधने यांचे नाव चर्चेत;

नांदर गणात अनिल बोधने यांचे नाव चर्चेत;

शिवसेनेचे युवा नेतृत्व ठरणार, पंचायत समितीचे उमेदवार?

पैठण, दि.१९ 🙁 प्रतिनिधी)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, पैठण तालुक्यात भावी उमेदवारांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. यामध्ये पंचायत समितीच्या नांदर गणात (सर्वसाधारण – पुरुष) या जागेवरून शिवसेनेचे युवा तडफदार नेते आणि नानेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अनिल बोधने यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अनिल बोधने हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावावर सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “भावी पं.स. सदस्य म्हणून अनिल बोधने” असा उल्लेख मोठ्या प्रमाणावर होत आहे.

सरपंच कार्यकाळात अनिल बोधने यांनी नानेगाव ग्रामपंचायतीत विकासकामांचा धडाका लावला. सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक व शेतातील वीजपुरवठा, पानंद रस्ते, विहिरी, गायगोठे व शेतीसाठी अनुदान अशा अनेक सुविधा ग्रामस्थांना मिळवून दिल्या. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचा प्रभाव केवळ नानेगावपुरता मर्यादित न राहता नांदर गण आणि दावरवाडी गटातही पोहोचला आहे.

शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले बोधने सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यात सतत पुढाकार घेतात. कुठलेही सामाजिक कार्य असो — कार्यक्रम असो किंवा मदत मोहिम — त्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

पक्षाने संधी दिल्यास नांदर गणातून अनिल बोधने यांना पं.स. उमेदवारी द्यावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच नव्याने झालेल्या नानेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अनिल बोधने यांनी भगवा झेंडा फडकावत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळेच आता नांदर गणातील पं.स. निवडणुकीत त्यांच्याकडे शिवसेनेचा तगडा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!