पैठण, दि. ९ : अभिजीत सोनवणे
पैठण, तालुक्यातील नांदर येथील स्व. नामदेवराव पाटील पिवळ माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत एक दिवस ज्ञानदान केले. यामध्ये कु. अमृता हरिभाऊ फाळके हिने मुख्याध्यापकपदाची तर भक्ती किशोर मगरे हिने उपमुख्याध्यापकपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे, शिक्षक बबन भावले, राजेंद्र थोरात, हरसिंग पाटील, रामकृष्ण पातकळ, रमेश पवार, संजय गुलालकर, श्रीमती राऊत तसेच कर्मचारी गोरखनाथ सोनवणे, श्री. कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे यांनी सांगितले की
“आमच्या शाळेत शिक्षक दिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदाही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत ज्ञानदानाचे कार्य करून शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.”




















