Homeताज्या बातम्यापैठण येथे काँग्रेसची नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूक आढावा बैठक संपन्न

पैठण येथे काँग्रेसची नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूक आढावा बैठक संपन्न

पैठण, दि.१५ (अभिजीत सोनवणे)

पैठण शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस माजी राज्यमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमास पैठण विधानसभा प्रभारी डॉ. सतेंद्र भुसारी, प्रदेश सचिव रवींद्र पा. काळे, तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे, शहर अध्यक्ष निमेश पटेल, माजी सभापती महमद हनिफ, रामनाथ चोरमले, महिला तालुका अध्यक्षा अंजली ताई बांगर, बाजार समिती संचालक राजू टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात अनिल पटेल यांनी सांगितले की, “येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. फडणवीस सरकार जातीयतेचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करत आहे. हे सरकार मतांची चोरी करून सत्तेत आले आहे,” अशी टीका त्यांनी केली.

प्रभारी डॉ. सतेंद्र भुसारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “मोदी आणि फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी असून समाजात भेदभाव वाढवत आहेत. राहुल गांधी हे एकटे या अन्यायाविरुद्ध लढत आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे ते म्हणाले.

प्रदेश सचिव रवींद्र पा. काळे, तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे आणि शहर अध्यक्ष निमेश पटेल यांनीही कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले.

महिला तालुका अध्यक्ष अंजली बांगर, महंमद हनिफ, रामनाथ चोरमले, सदानंद खडसन, रावसाहेब नाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला नंदकिशोर नजन, योगेश जोशी, दत्ता फसाटे, निखिल काळे, संभाजी काटे, रवींद्र आम्ले, अनिल मगरे, हमीद खान सर, मुश्ताक पठाण, रिझवान शेख, भीमराव नवगिरे, आबेद पठाण, गौरव आठवले, चैतन्य बनकर, राहुल दाभाडे, सखाराम पांडव, ऍड. रमेश गव्हाणे, नितीन घटे, प्रकाश निवारे, जकी अन्सारी, योगेश शिपणकर, योगीराज पवार, विशाल तांबे, राजू निवारे, इरफान पठाण, शिवाजी सदलासे, आंबादास ढवळे, हस्नोद्दीन कटारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

error: Content is protected !!