पाण्याची नासाडी थांबली; प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी
कोपरगाव : दि. १० : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील गिरमे वस्ती, होले वस्ती व समतानगर परिसरात गेल्या कितेक दिवसांपासून पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी लिंकेज होत होते. यामुळे अमूल्य पाणी वाया जात असून परिसरात तीव्र पाणीटंचाई भासत होती.

या गंभीर समस्येबाबत दक्ष नागरिक संजयजी होले (मामा) यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व संबंधित विभागीय नगरसेवक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून सदर बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित ठिकाणी पाईपलाईन खोदून दोन ठिकाणचे लिंकेज तात्काळ दुरुस्त करण्यात आले असून, वाया जाणारे पाणी बंद करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती संजयजी होले यांनी दिली.
या कामासाठी कलविंदर सिंग दडियाल व खर्डे विक्रांतभाऊ यांना कळविण्यात येताच त्यांनी त्वरित दखल घेत आवश्यक कामगार उपलब्ध करून सहकार्य केले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणी लिंकेजचा प्रश्न अखेर मार्गी लागला.
तसेच कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. परागजी शिवाजी संधान यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशांमुळेच ही समस्या तत्काळ सोडविणे शक्य झाले, असे नागरिकांनी सांगितले. या दुरुस्तीमुळे प्रभागातील नागरिकांची पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
या यशस्वी कार्यवाहीबद्दल संजयजी होले (मामा), ज्योतीताई औताडे, प्रकाशजी आबक, किरणशेठ मेहेत्रे (नाना), किरणभाऊ होले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचे व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.




















