Homeताज्या बातम्यासर जे. जे. समूह रुग्णालयास राज्य महिला आयोगाची नोटीस.

सर जे. जे. समूह रुग्णालयास राज्य महिला आयोगाची नोटीस.

महिला डॉक्टरच्या तक्रारीकडे दुर्लक्ष;

सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश…

मुंबई, दि. ५ : अजय मगरे

राज्य महिला आयोगाकडे दाखल तक्रारीवर विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने आणि सुनावणीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्याने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली आहे.

रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील एका महिला प्राध्यापक-डॉक्टरांनी त्यांच्या विभागप्रमुखाकडून होत असलेल्या सततच्या मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत १० जुलै २०२५ रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आयोगाने रुग्णालय प्रशासनाकडून १८ जुलै व २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वेळा सविस्तर अहवाल मागविला होता. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आयोगाने याची गंभीर नोंद घेत २९ ऑक्टोबर रोजी सुनावणी आयोजित केली.

सुनावणीस उपस्थित रुग्णालय प्रतिनिधीकडे तक्रार व त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबत कोणतीही ठोस माहिती नव्हती. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा व आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयोगाने अधिष्ठात्यांना नोटीस बजावली आहे.

आयोगाने रुग्णालयातील अंतर्गत तक्रार समितीची (आय सी कमिटी) संपूर्ण माहिती, तक्रारदार महिलेच्या प्रकरणातील कार्यवाहीचा सविस्तर अहवाल, तसेच संबंधित अधिकारी सेवानिवृत्तीनंतर पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने तक्रारदार महिलेस मानसिक त्रास होत असल्याची बाब शासनाला अवगत केली का, याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

हा सविस्तर अहवाल सात दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता, सर जे. जे. समूह रुग्णालय यांना देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

error: Content is protected !!