समग्र सोशल फाउंडेशन संचालित कृपाळु वृद्धाश्रम या सामाजिक संस्थेतर्फे….
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरव…
विजय जाधव यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’…
छ.संभाजीनगर दि.५ ( दिलीप गायकवाड )
समग्र सोशल फाउंडेशन संचालित कृपाळु वृद्धाश्रम या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. उद्घाटन विधान परिषदेचे नूतन आमदार संजयभाऊ केनेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मार्गदर्शक एस.पी. जवळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या मनीषाताई भन्साळी (शहर उपाध्यक्ष व उद्योजक) उपस्थित होत्या.
कोपरगाव तालुक्यातील मूर्शतपूर येथील शेतकरी व्यवसायातील विजय जाधव यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार संजय केनेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्म आणि संतसेवा क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये श्री श्री १००८ स्वामी शनिभक्त सुखदेवजी महाराज, ह.भ.प. रामकृष्ण अकोलकर महाराज, डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब, उद्योजक केदार पालोदकर, प्रा. जगदीश वेदपाठक, डॉ. संजय वाघ (स्वच्छ भारत मिशन), प्रियंका मुथा (जितो जिल्हा अध्यक्ष) आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष अण्णा सुरडकर यांनी केले, तर मयूर सुरडकर यांनी अतिथींचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समग्र सोशल फाउंडेशनच्या कार्याचे मन:पूर्वक कौतुक केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:
शेखर भैय्या मस्के (उद्योजक),
एड.ज्योती थोरात (धर्मादाय कार्यालय),राजेश वाघ
(पी.एस.आय., वाळूज पोलीस स्टेशन),बबन दिंडोरे पाटील (संस्थापक, नवीन औरंगाबाद गणेश उत्सव समिती),लता जाधव (दामिनी पथक),
एड.श्रीकांतजी मिश्रा (धर्मादाय कार्यालय),भिवसन वाघ (मा. पोलीस निरीक्षक),किशोर दुग्गड,
रमेशजी मेहता (उद्योजक, प्रसिद्ध गायक व संगीतकार),
प्रा. जगदीशजी वेदपाठक (मराठवाडा म्युझिक सर्कल, रिसर्च फाउंडेशन),निलेशजी अग्रवाल मित्तल (सचिव, राजस्थान प्रकोष्ठ, भाजपा),
शिवाजी काळे (मा.उपायुक्त, पशुसंवर्धन),डॉ. संजय वाघ (स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद, छ. संभाजीनगर),संतोष पाटील चेपूरवार (नरसिम्हा प्लेसमेंट प्रा. लि.),साईनाथ धोंडीराम हजारे (मराठवाडा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ),
किशोरचंद मणिकचंद दुग्गड,रमेशशेठ मेहता
प्रियांका दिनेश मुथा (जितो जिल्हा अध्यक्ष),अध्यक्षा गणेश बावकर (मा.अधिकारी, जिल्हा परिषद),राजेश चंदनमल पगारीया (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय जैन संघटना)डॉ. अशोक कोठारी,रविंद्रजी जैन
शंकर अण्णा म्हात्रे (भाजपा),
संतोष पाटील चेपूरवारडायरेक्टर, निओन सिटी (सहारा सिटी),ह.भ.प.मयुरीदीदी संजय डोबळे महाराज आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे गणेश फन्टे यांनी आभार मानले. तसेच अनिल काथार यांनीही आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त संचालक मंडळ, समग्र सोशल फाउंडेशन, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



















