Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौक्या लवकरच बंद होणार - परिवहन मंत्री प्रताप...

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौक्या लवकरच बंद होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ११ ( अजय मगरे )

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराज्य वाहतूक सुरळीत होणार असून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

१९६६ पासून कार्यरत असलेल्या या चौक्यांची आवश्यकता आता डिजिटल प्रणाली व जीएसटी मुळे उरलेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निर्देश दिले होते. राज्य ट्रान्सपोर्ट युनियननेही यासाठी सातत्याने मागणी केली होती.

पूर्वी “इंटिग्रेटेड चेक पोस्ट” प्रकल्पांतर्गत अदानी प्रा.लि. या संस्थेला चौक्यांचे व्यवस्थापन देण्यात आले होते. आता हे चेक पोस्ट बंद केल्यामुळे ५०४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.तसा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे संबंधित मालमत्ता व यंत्रणा परिवहन विभागाच्या मालकीची होणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र आधुनिक, कागदविरहित व तंत्रज्ञानाधारित परिवहन व्यवस्था स्वीकारणाऱ्या राज्यांमध्ये सामील होईल. यामुळे वाहतूक सुलभ होईल, कार्यक्षमता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकाल; कोपरगावच्या संत ज्ञानेश्वर स्कूलची यशाची परंपरा कायम..

दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी; गेल्या दशकात एकही विद्यार्थी नापास नाही कोपरगाव : दि.८,दिलीप गायकवाड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी...

24 मध्ये 973 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची आकडेवारी सांगते, 25 मध्ये 596 पोलिसांचे...

पुणे: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 2024 च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की शहरात त्या वर्षात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या 973 घटनांची...

मी तिथे पोहोचत आहे, मला फक्त माझा स्वतःचा वेळ हवा आहे: मानस धामणे |...

पुणे: अव्वल दर्जाच्या टेनिसची गोडी लागलेल्या मानस धामणेला वाटते की तो फार मागे नाही आणि त्याने यश मिळवणे ही काळाची गरज आहे.कझाकस्तानमधील...

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

error: Content is protected !!