पैठण. दि १३. प्रतिनिधी
दावरवाडी येथील श्रीराम मंदिर संस्थान परिसरात मंगळवार दि. १३ पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले असून, भागवताचार्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कथा सादर केली जात आहे.
हा सोहळा सोमवार (दि. १९) रोजी सांगता सोहळ्याने संपन्न होणार आहे. सांगतेच्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. वारकरी रत्न बाळू महाराज गिरगावकर यांचे हरिकिर्तन होईल. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक बबनराव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, ताराबाई अंबादास शेळके, सिंधुबाई अरविंद पारखे, मिनाबाई सुभाषराव खताळ आदींनी केले आहे.
[छायाचित्र: श्रीमद् भागवत कथेदरम्यान आरती करताना ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी, बबनराव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, बाळासाहेब वाघमोडे, शुभम वाघमोडे आदी. अंबादास एडके




















