Homeताज्या बातम्याकोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जलदगतीने सर्वेक्षण करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण...

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जलदगतीने सर्वेक्षण करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जलदगतीने सर्वेक्षण करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २० ( प्रतिनिधी )

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्वेक्षणाचे काम निविदेनुसार निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे सांगितले.

या प्रकल्पात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) अंतर्गत मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे कामे हस्तांतरित करण्यात आली आहेत. बैठकीत पवना धरण परिसरातील पर्यटन विकास आराखड्याचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीस ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, तसेच दोन्ही खोऱ्यांच्या विकास महामंडळांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले की, “सर्वेक्षणाचे काम गतीने पूर्ण झाल्यास पुढील निविदा प्रक्रिया सुलभ होईल. एमआरडीपी अंतर्गत कामांचे सर्वेक्षण तीन महिन्यांत पूर्ण करावे. गरज भासल्यास अतिरिक्त एजन्सी नेमून कामे पूर्ण करा व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करा.”

यावेळी राधानगरी धरणाच्या गेटचे काम तसेच सांगली-कोल्हापूर बंधाऱ्यावर बॅरेज बांधण्याच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले.

पवना धरणाच्या पर्यटन विकासासाठी सादरीकरण

पवना धरण परिसरात पर्यटन सुविधा विकसित करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरण केले. त्यावर मंत्री विखे-पाटील यांनी पर्यावरणस्नेही व प्रदूषणविरहित पर्यटन आराखडा तयार करण्याचे तसेच धरण परीसरातील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले.

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील जलसंपत्तीचे अधिक प्रभावी नियोजन आणि वापर शक्य होईल, तसेच सिंचन व पर्यटन क्षेत्रालाही गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!