Homeताज्या बातम्यास्नेह आशा फाउंडेशनतर्फे पालिकाशाळेत १० संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण

स्नेह आशा फाउंडेशनतर्फे पालिकाशाळेत १० संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण

डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अंतर्गत गौरव

मुंबई, दि.१९ ( प्रतिनिधी )

डिजिटल साक्षरतेला चालना देत स्नेह आशा फाउंडेशन तर्फे मुंबई आणि ठाणे येथील महापालिकेच्या १० शाळांमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, उद्योजक निरंजन हिरानंदानी, मुंबई महानगर पालिकेचे सह आयुक्त डॉ. अमित सैनी , विकासक बोमन ईरानी व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या उपक्रमांतर्गत कॉम्प्युटर लॅब ची स्थापना करण्यात आली असून, ६ वी ते १० वीमधील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. संगणक साक्षरता, कोडिंग, ए आय व डेटा अ‍ॅनालिटिक्स यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण या प्रयोगशाळांतून दिले जाणार आहे.

शिष्यवृत्ती योजनेच्या ‘सरस्वती’, ‘शक्ती’ व ‘लक्ष्मी’ या तीन उपघटकांद्वारे १२ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक व मार्गदर्शकीय पाठबळ देण्यात आले. यामध्ये शिक्षण शुल्क, लॅपटॉप, कोचिंग व करिअर सल्ल्याचा समावेश आहे.

फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती सिद्धी जयस्वाल यांनी यावेळी सांगितले की, संगणकीय शिक्षणासाठी लॅपटॉप देण्यात आलेल्या “विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षणा अभावी लॅपटॉप वापरण्यात अडचण येते असे सांगितल्यावर डिजिटल अंतर ही तांत्रिक नव्हे, तर सामाजिक गरज आहे हे जाणवले. आजचा उपक्रम आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

सहसंस्थापक स्नेहा जयस्वाल यांनीही नमूद केले,की “केवळ शिक्षणाची उपलब्धता नव्हे, तर संधी व सशक्तीकरण यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. आमच्या संगणक प्रयोगशाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारलेले प्लॅटफॉर्म आहेत.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम,तंत्रज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण व शपथविधी यामुळे डिजिटल समावेशनाच्या दिशेने सामूहिक संकल्प अधोरेखित झाला. आय आय टी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते राज्यस्तरीय खेळाडूंवर आधारित प्रेरणादायी कहाण्यांचाही गौरव या वेळी करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!