Homeताज्या बातम्याकोपरगाव शहरात एचपी गॅसची दर्जेदार सेवा – मॅनेजर लक्ष्मण निमसे यांची माहित

कोपरगाव शहरात एचपी गॅसची दर्जेदार सेवा – मॅनेजर लक्ष्मण निमसे यांची माहित

कोपरगाव, दि.२१ ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव शहरात हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस कंपनी (एचपी गॅस) च्या शहर वितरण विभागामार्फत गॅस ग्राहकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे कंपनीचे कार्यालयीन मॅनेजर लक्ष्मण निमसे यांनी सांगितले.

पावसाळ्यातही गॅस वेळेत पोहोचवण्यासाठी आमची टीम सदैव सज्ज असते. ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ घेतल्या जातात आणि योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोपरगाव शहरात एचपी गॅसच्या तीन एजन्सी कार्यरत आहेत. त्यामध्ये गुरुराज एचपी गॅस कंपनी (आद्यौगिक वसाहत), गोपाळ कृष्ण गॅस कंपनी (संसार) आणि मुख्य कोपरगाव गॅस कंपनी यांचा समावेश आहे.

पाच किलोच्या गॅस सिलिंडर संदर्भात बोलताना, निमसे यांनी सांगितले की, “सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत या सिलिंडरची किंमत ३१९ रुपये आहे. उर्वरित रक्कम थेट सरकारकडून लाभार्थ्याच्या खात्यावर पाठवण्यात येते. मात्र ग्राहकांकडून रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात पैसे स्वीकारले जातात.”

ओपन मार्केटमध्ये पाच किलोचा सिलिंडर सुमारे ५३० रुपयांमध्ये उपलब्ध होतो. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे चार हजार आहे. ही योजना फक्त घरगुती वापरासाठी आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये एक सिलिंडर देण्यात आला होता, मात्र उर्वरित दोन सिलिंडर देण्यात आले नसल्याने यासंबंधीची माहिती उपलब्ध नाही.

भारत गॅसच्या दोन वितरण कंपन्याही कोपरगावात कार्यरत आहेत. पाच किलोच्या सिलिंडरबाबत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५६.५० रुपये आहे, तर व्यावसायिक वापरासाठी १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १७५० रुपये इतकी आहे. गॅस वितरणात ब्लॅकमेलिंग अथवा अनधिकृत व्यवहार होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“डिलिव्हरी बॉयकडून कोणत्याही प्रकारचे पैसे स्वीकारले जात नाहीत. जर कोणताही डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून पैसे मागत असेल, तर ग्राहकांनी त्वरित तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणी कंपनी कठोर कारवाई करेल,” असा इशाराही निमसे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

error: Content is protected !!