Homeताज्या बातम्यानांदर येथील न्यू हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

नांदर येथील न्यू हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

पैठण, दि.२१ ( अभिजित सोनवणे )

पैठण तालुक्यातील, नांदर येथील न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवावे या हेतूने विविध योग क्रियांचा सराव शाळेच्या प्रांगणात करण्यात आला.

या कार्यक्रमात सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून आपल्या एकतेचे आणि शारीरिक सुदृढतेचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, भुजंगासन, शवासन यासारख्या योगासने एकरूपतेने केली. योगासने करताना विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्त विशेष उल्लेखनीय होता.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत धुपे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक लाभ समजावून सांगितले. “योग हा केवळ व्यायाम नसून तो जीवनशैली आहे. तो नियमितपणे केल्याने मन:शांती, एकाग्रता आणि आरोग्य सुधारते,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, एम. पाटील, रमेश पवार, श्रीमती राऊत मॅडम, एस. गुलालकर यांनी विशेष मेहनत घेतली. याशिवाय गोरखनाथ सोनवणे, बबन ठेणगे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही मोलाचा सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी योग दिनाच्या उपक्रमातून मिळालेला अनुभव शेअर करत नियमित योगाचा संकल्प केला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते, असे प्रतिपादन शिक्षकांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

error: Content is protected !!