कोपरगाव,दि.२६ ( दीपक साटोटे )
कोपरगांव तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी बहुजन शक्ती न्यूजचे कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी ऋषिकेश प्रभाकर बोराडे, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी संतोष दत्तात्रेय नलगे व इतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बोराडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्य व विचारसरणीवर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संतोष नलगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास विजय आढाव, रवींद्र कुलकर्णी, बाबू आव्हाड, संगीता शिंगाडे, सीमा जमधाडे, कल्पना सोनवणे (सर्व कनिष्ठ सहाय्यक) तसेच पत्रकार दीपक साटोटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम




















