Homeताज्या बातम्यापंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याची विहिरीत उडी; पैठण तालुक्यात खळबळ....

पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याची विहिरीत उडी; पैठण तालुक्यात खळबळ….

अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक; संतप्त नातेवाईकांचा गुन्हा नोंदवण्याचा ठाम पवित्रा….

पैठण, ता. १८ : ( अभिजीत सोनवणे )

पैठण तालुक्यातील खादगाव येथील संजय शेषराव कोहकडे (वय ४५) या शेतकऱ्याने महसूल अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहकडे यांची शेती खादगाव–खेर्डा रस्त्यालगत असून पाण्याचा त्रास कायम होता. या संदर्भात त्यांनी वारंवार महसूल कार्यालयात धाव घेतली; मात्र त्यांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. अखेर मंगळवारी बालानगरच्या मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आले.

दरम्यान, कोहकडे यांनी आपल्या शेतीचे झालेले नुकसान दाखवले असता, अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे सांगितले जाते. या अपमानामुळे संतप्त झालेल्या कोहकडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीकडे धाव घेतली आणि त्यात उडी मारल्याचे उपस्थितांनी सांगितले, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात अपयश आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर मृतकाचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत “जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदनास परवानगी नाही” असा ठाम पवित्रा पाचोड ग्रामीण रुग्णालयात घेतला.

दरम्यान, पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडीत, उपनिरीक्षक राम बारहाते व पोलीस नाईक रविंद्र आंबेडकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन संतप्त नातेवाईकांशी चर्चा केली. “कायदेशीर कारवाई करण्यात येईल” असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीस परवानगी दिली.

या घटनेने संपूर्ण पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!